ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्ह्यातील हॉटेल व दुकान व्यावसायिकांना दिलासादायक बातमी

जिल्ह्यातील हॉटेल व दुकान व्यावसायिकांना दिलासादायक बातमी

प्रकाशन: 13 Aug 2021 10:54 AM
वाचन संख्या 153


सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातही हॉटेल्स, दुकाने , रेस्टॉरंट्स यावरील निर्बंध शिथिल होणार अशी माहिती मिळत आहेे . संपूर्ण राज्यात लागू केलेले नियम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लागू केले जात आहेत. त्यामुळे सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणारी सर्व दुकाने हॉटेल्स आता रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्ट पासून करण्यात येणार आहे.
राज्यातील हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स, यावरील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
हॉटेल दुकाने यावरील निर्बंध जरी शिथिल केले असतील तरी सुध्दा हॉटेल्स ग्राहकांची क्षमता ५० टक्के इतकीच ठेवण्यात आली आहे.
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने नवे नियम लागू करीत रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे की नाही याबाबत व्यापारी वर्गात शंका होती. मात्र संपूर्ण राज्यात हे नियम लागू केले गेले आहेत तेच नियम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आहेत त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत दुकाने हॉटेल्स सुरू राहतील असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स