कोरोनाच्या लसीकरणाला नकार दिल्याने वायुदलातून हकालपट्टी
ब्युरो न्यूज:- अहमदाबाद येथील वायुदलातील एका कर्मचाऱ्याने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास मनाई केल्याने त्याची हवाई दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती भारतीय वायुदलकडुन देण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णतः कमी झालेला नसून कोरोना प्रतिबंधक लस घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तरीही भारतीय वायुदलातील ९ कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेण्यास नकार दर्शवला असून, त्यामधील एकाला सेवेतून बरखास्त केल्याची माहिती केंद्र सरकारकडून न्यायालयात देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)