ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोलर स्केटिंग  मध्येमसुरे चांदेरवाडीच्या रीना परबची सुवर्ण कामगिरी!

रोलर स्केटिंग मध्येमसुरे चांदेरवाडीच्या रीना परबची सुवर्ण कामगिरी!

प्रकाशन: 17 Jan 2022 07:28 PM
वाचन संख्या 99

अर्जेंटिना येथील इंटरनॅशनल स्पर्धेत रीना करणार  देशाचे नेतृत्व

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मोहाली पंजाब येथे  नुकत्याच संपन्न झालेल्या नॅशनल  रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप http://localhost/news/public/uploads/2021 स्पर्धेत मसुरे चांदेरवाडीची सुकन्या  रीना बाबा परब हिने सुवर्णपदक पटकावले आहे. रीना परब ऑक्टोंबर २०२२ मध्ये अर्जेंटिना येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व करणार आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत ठाण्यातील रोलर आणि आइस स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू योहानन फर्नांडिस- सुवर्ण, परम वडोर-रौप्य,सोहम मोरे-रौप्य,रीना बाबा परब- सुवर्ण अशी  २ सुवर्ण पदके, २ रौप्य पदके जिंकली आहेत.विजेत्यांना रोख बक्षीस, मेडल  देऊन सन्मानित करण्यात आले.अखिल भारतीय स्तरावर सर्व राज्यातून आलेल्या स्पर्धकांमधून  हे यश मिळाले आहे.या विजयी स्पर्धकांना प्रशिक्षक राहुल पंदीरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. रीना ही चांदेरवाडी येथील उद्योजक आणि मुंबई कुर्ला बैल बाजार येथील समाजसेवक बाबा परब यांची सुकन्या आहे . बाबा परब हेसुद्धा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू होते. रीना परब ही दररोज चार ते पाच तासांचा नित्य सराव करत असते. सुमारे दहा-बारा वर्षाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा रीना हिने स्केटिंग मध्ये सराव करण्यास सुरुवात करून हे घवघवीत यश संपादन केले. बारा वर्षापूर्वी  रीना हिची ऑलम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी सुद्धा भारत देशा कडून निवड झाली होती परंतु काही कारणामुळे त्या वेळी तिची ही संधी सुटली होती. रीना परब म्हणाली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे चांदेरवाडी गावची एक कन्या आज एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी पात्र होऊन भारत देशासाठी खेळणार असल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. आपल्या देशातील अनेक सहभागी नामवंत खेळाडू मधून सुवर्णपदक मिळवून मी या स्पर्धेसाठी पात्र ठरल्याचा मला अभिमान आहे. रोलर स्केटिंगची एक खेळाडू म्हणून महाराष्ट्र शासनाला किंवा भारत सरकारला माझी एक विनंती राहील की अशा स्पर्धांमधून विजेत्या खेळाडूंना शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यास या खेळाचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे. यासाठी स्थानिक आमदार, खासदार, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने जास्तीत जास्त प्रयत्न करून अशा सर्व खेळाडूंना शासकीय नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रीना परब ही सुद्धा मुंबई येथे स्केटिंग खेळाडूंना प्रशिक्षण देते.  आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूनाही भविष्यात पुढे आणण्यासाठी रिना हिचा प्रयत्न आहे. यासाठी मोफत मार्गदर्शन करण्याचीही तयारी तिने दर्शविली आहे. रीना हिचा  मसुरे गावाच्या आणि परब मराठा समाजाच्या वतीने लवकरच नागरी सत्कारही करण्यात येणार आहे.  रीना परब ही मसुरे येथील प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर  श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची पुतणी आहे. रीना हीचे  उद्योजक दीपक सावंत, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, प्रसिद्ध उद्योजक दीपक परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंट्या गावकर, जिल्हा परिषद सदस्य सौ सरोज परब, पंचायत समिती सदस्य सौ गायत्री ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मुंबई येथील समाजसेवक प्रकाश परब, महेश बागवे विलास मेस्त्री, परब मराठा समाजाचे जी एस परब, आनंद मुळीक आणि मसुरे गावातून अभिनंदन होत आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स