ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा बाजारपेठेत अवकाळी पावसाची हजेरी

बांदा बाजारपेठेत अवकाळी पावसाची हजेरी

प्रकाशन: 17 Jan 2022 07:34 PM
वाचन संख्या 150

व्यापाऱ्यांची धावपळ तर ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

बांदा | राकेश परब : आज सोमवारी बांद्याचा आठवडा बाजार असल्याने बांदा दशक्रोशीतील हजारो ग्राहक बाजारपेठेत येतात. संध्याकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व्यापाऱ्यांची दुकाने आवराआवर करण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यातच ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. परंतु पावसाचा जोर वाढल्याने बाजारपेठ ओस पडली होती. महापुरात अगोदरच झालेले नुकसान भरून आले नाही अन आज झालेले नुकसान पाहून दुकानदार व व्यापाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. बांदा बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरु असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. दुकाने आवराआवर करताना व्यापाऱ्यांच्या दमझाक झाली. पावसात माल भिजू नये यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली अन अचानक आलेल्या पावसात काहींचे नुकसान झालेच. सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. ग्राहकांनी मात्र दुकानांचा आसरा घेतला. दरम्यान उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स