ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रानभाज्यां बाबत जनजागृती आवश्यक! तहसीलदार अजय पाटणे

रानभाज्यां बाबत जनजागृती आवश्यक! तहसीलदार अजय पाटणे

प्रकाशन: 12 Aug 2021 08:48 PM
वाचन संख्या 46

कातवड येथे रानभाजी महोत्सवाचे उदघाटन

मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मौजे कातवड येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजित करण्यात आले. मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी कोरोनाच्या काळातही लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे नीटनेटके आयोजन केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. मान्यवरांनी रानभाजी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच तालुक्यातील बारा महिला बचत गटांनी मांडलेल्या विविध पाककलाकृतींची पाहणी केली व सहभागी गटांना प्रमाणपत्राचे वितरण केले.
यावेळी गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव यांनी शेती विकासाची संकल्पना उपस्थितांपुढे मांडली. मालवण तालुक्यातील कृषी विभाग नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी कार्यतत्पर असतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यानी आयोजित करावेत, त्यास पदाधिकारी म्हणून आमचे नेहमीच सहकार्य लाभेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी केले.
महोत्सवादरम्यान रानभाज्यांचे आहारातील महत्व व संवर्धन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे विषय विशेषज्ञ डॉ. विलास सावंत यांनी मार्गदर्शन केले तर धन्वंतरी संस्था आंबडोसचे वैद्य संदीप तळगावकर यांनी औषधी वनस्पतींची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातून दर्जेदार रानभाज्यांचे नमुने गोळा करण्यासाठी आचरा मंडळ कृषी अधिकारी अजित गवंडे, कृषी पर्यवेक्षक श्री सिताराम परब, कृषी सहाय्यक अमृता भोगले, विद्या कुबल, पवन सौंगडे, मिलिंद कदम, सुशीलकुमार शिंदे आदी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच सुरेश परब, सुजय घाडी, वैभव नाईक, अनिल सुकाळी, शिवराम चव्हाण, काशिनाथ चव्हाण, प्रभाकर सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, सरपंच उदय नाईक, माजी सभापती मनीषा वराडकर, आत्मा समिती अध्यक्ष उदय दुखंडे, आत्मा समिती सदस्य भाग्यश्री चव्हाण, उज्वला दळवी, गीता चौकेकर, ग्रामसेवक सौ युती चव्हाण, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी उपस्थित होते. ग्रामपंचायत कातवड व पंचक्रोशीतील महिला पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी आभार व्यक्त केले. प्रस्तावीक मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन धनंजय गावडे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 290

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स