जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार पार
ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन 197 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 1001 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज 197 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1001 वर पोहोचली आहे. तर आज 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज पॉजिटीव्ह आलेल्यांमध्ये देवगड तालुक्यातील 13 , दोडामार्ग 25, कणकवली 41 , कुडाळ 36 , मालवण 22 , सावंतवाडी 31 , वैभववाडी 6, वेंगुर्ला तालुक्यातील 18, जिल्ह्याबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे . जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 54 हजार 323 पॉजिटीव्ह मिळालेल्या रुग्णांपैकी 51 हजार 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजअखेर 1 हजार 466 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)