मोफत आरोग्य तपासणी शिबीर
देवगड/ संतोष साळसकर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दि.९ जानेवारी २०२२रोजी देवगड तालुक्यातील आरे गावात ग्रामपंचायत सभागृहामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा लाभ एकूण ७५ ग्रामस्थांनी घेतला. या शिबिरामध्ये हाडांची ठीसुळता तपासणी, रक्तगट तपासणी , ब्लड शुगर तपासणी संबधित तज्ञांकडून करण्यात आली तसेच महिलांच्या अन्य आरोग्य विषयी समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.या शिबिरासाठी डॉ.योगेश नवांगुळ (अध्यक्ष, रा.स्व.संघ जनकल्याण समिती, सिंधुदुर्ग जिल्हा ) तसेच डॉ.राजेंद्र पारकर (शिरगांव), स्त्री रोग तज्ञ डॉ.सौ.मनीषा नारकर (फणसगांव) असे जिल्ह्यातील एकूण ३ डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.मंदार कार्लेकर सहभागी झाले होते.याप्रसंगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधे देण्यात आली. या शिबीराला आरे गावचे सरपंच श्री. सहदेव कांबळे, उपसरपंच श्री. महेश पाटोळे, पंचायत समिती सदस्य श्री.अजित कांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रसाद कांबळे, पोलीस पाटील श्री. राजेंद्र कदम, तसेच सौ.मानसी पाटोळे,सौ.मेघना पाटोळे, रा.स्व.संघ जनकल्याण समिती सिंधुदुर्ग जिल्हा समिती सदस्य व स्थानिक संघ कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिबिराचे आयोजन स्थानिक महिला कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने झालं.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)