ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
संदीप चौकेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

संदीप चौकेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

प्रकाशन: 11 Jan 2022 02:35 PM
वाचन संख्या 104

तर हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांना समाज मित्र पुरस्कार

कणकवली / उमेश परब – कणकवली तालुक्यातील हळवल येथील लिंगेश्वर कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ता हा मनाचा पुरस्कार संदीप चौकेकर यांना प्रदान करण्यात आला. तर हळवल उपसरपंच अरुण राऊळ यांना समाज मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदीप चौकेकर हे प्राणजीवन सहयोगी संस्थेचे संस्थापक असून कोरोना काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सॅनिटायझर करणारे एकमेव सामाजिक कार्यकर्ते होय. या सोबतच प्राणजीवन सहयोगी संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात त्यांचे समाजाप्रती असलेले अमूल्य योगदान पाहता लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष लवू परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून गेली २० वर्षे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. अशीच समाजाप्रती आवड असलेल्या व्यक्तींचा दरवर्षी या मंडळामार्फत सन्मान केला जातो. हळवल उपसरपंच तथा लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अरुण मारुती राऊळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सण २०२१ /२२ चा समाज मित्र हा पुरस्कार अरुण राऊळ यांना सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र परब, अध्यक्ष लवू परब, माजी अध्यक्ष सुभाष परब, वागदे माजी ग्रामपंचायत सदस्य राजू गावडे, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी राकेश चव्हाण, भास्कर राणे, राजू राणे, अरुण राणे, मारुती सावंत, उपाध्यक्ष भरत गावडे, वामन परब, दीपक राऊळ, खजिनदार राकेश गावडे, सचिव दीपेश परब, पत्रकार गिरीश परब, विकास गावडे, मनोज वाटेगावकर, श्रीकृष्ण यादव, मंगेश गावडे, सचिन परब, सुरेश पाडावे, शिवा राणे, प्रशांत गावडे, दशरथ परब, संतोष परब, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार उमेश परब यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स