ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

प्रकाशन: 11 Jan 2022 01:29 PM
वाचन संख्या 32

आचरा/ विवेक परब : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुलने यश संपादन केले आहे. या , परीक्षेत अपेक्षा कांदळगावकर, सॅव्हिया फर्नांडिस, सानिका जोशी यांनी शिष्यवृत्ती पटकाविली आहे.गतवर्षी कोरोना महामारी च्या संकटाला सामोरे जात असताना देखील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या अथक प्रयत्नांतून या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले आहे. सन http://localhost/news/public/uploads/2020 21 मध्ये घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल आचरा, या शाळेच्या अपेक्षा अशोक कांदळगावकर(५६.६६%), सॅव्हिया संतातोन फर्नांडिस(५४.६६%), सानिका राजन जोशी(५०.६६%) या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या विशेष गुणवत्ता यादीमध्ये येत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ‘द आचरा पीपल्स असोसिएशन’चे पदाधिकारी, स्थानिक कमिटी चेअरमन निलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स