ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिक वापरण्यास मनाई

राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिक वापरण्यास मनाई

प्रकाशन: 12 Aug 2021 05:48 PM
वाचन संख्या 54

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अपमान होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केली आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपपंचायत, आरोग्य केंद्र अशा शासकीय-निमशासकीय यंत्रणा व स्थानिक पोलीस यंत्रणा यांनी प्लास्टिक ध्वजाचा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन शुभांगी साठे यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमानंतर रस्त्यावर किंवा लोकवस्ती च्या ठिकाणी जमिनीवर पडलेले राष्ट्रध्वज योग्य तो मान राखून ध्वजसहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. येत्या १५ ऑगस्ट ला स्वातंत्र दिन समारंभ जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी संस्थांमार्फत ध्वजारोहणाने साजरा होणार आहे. रस्त्यात पडलेले व विखुरलेले राष्ट्रध्वज प्लास्टिकचे असतील तर ते बरेच दिवस नष्ट होत नसल्याने ते त्याच ठिकाणी पडलेले आढळतात. ही बाब राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने गंभीर असल्याने राष्ट्र ध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही. योग्य तो मान राखून कागदी ध्वजाचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देऊ नये. ते खराब झाले असल्यास ध्वजसंहीतेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावेत, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स