रानभाज्या व सेंद्रिय भाज्या खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहील...!
सभापती मनोज रावराणे पं. स. सदस्य गणेश तांबे यांचे उत्कृष्ट नियोजन
कणकवली | उमेश परब : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व शेतकरी सल्ला समितीच्यावतीने आज जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा भरणी येथे जागतिक आदिवासी दिंन महोत्सव आज 12 ऑगस्ट रोजी रानभाजी उत्सवाचा आणि प्रदर्शनाचा शुभारंभ कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी पं. स. सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे सभापती मनोज रावराणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच यावेळी आलेले आनंद साळसकर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस हजारे, कृषी अधिकारी बी. तोरणे, शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष वसंत तेंडूलकर,भरणी सरपंच गुरव, याचेही पुष्पगुच देऊन स्वागत करण्यात आले.
या रानभाजी प्रदर्शनात गावतील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध केल्या होत्या त्यामधे दुधुली, चवयी,आंबुशी,पेवगा, तोंडा, फोडशी, चीना,करादे,कुडाच्या शेंगा, एकपानी,शेवंग्याचा पाला,भारंगी,अंबाडा, घोटवेल,कुर्डू,आघाडा,अळू,सुरण,टाकला, दिंडा,शेवरा,पिंपळ,उंबर,रताळी,शेडवल, कारटोली,पेवगा,पानांचा ओवा,बांबूचा कोंब,आशा 22 पेक्षा जास्त रानभाजीची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली होती
त्यामुळे या रानभाज्यांच्या प्रदर्शनामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळाले
यावेळी सभापती मनोज राणे यांनी बोलताना सांगितले की मानवाच्या प्रामुख्याने तीन गरजा आहेत त्यात अन्न, वस्त्र, व निवारा त्यामधील वस्त्र आणि निवारा आपल्याला मिळतोय पण आपलें आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर अण्णाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे यासाठी रासायनिक भाज्या न खाता या रानभाज्या व सेंद्रिय भाज्या खाव्यात तरच आपले आरोग्य चांगले राहील असे सभापती रावराणे यांनी सांगितले
तसेच या महोत्सवात फोंडा कृषी महाविद्यालयाचे प्रा. ओगले हे शेतकर्यांना मार्गदर्शन केले यावेळी पं. स. सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे, कृषी पर्यवेक्षक आर एस सावंत, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) व्ही.एम.पाटील,कृषी सहाय्यक रावराणे,व शेतकरी उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)