ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणचे 'स्वराध्या फाउंडेशन' वाजवणार कृष्णांक महोत्सवात ट्रीपल गेम...?

मालवणचे 'स्वराध्या फाउंडेशन' वाजवणार कृष्णांक महोत्सवात ट्रीपल गेम...?

प्रकाशन: 07 Jan 2022 06:59 PM
वाचन संख्या 88

एकांकिका,दीर्घांक आणि नाटक अशा तिन्ही नाट्यप्रकारांचा एकत्रित मिलाफ अशी रसिकांसाठी अफलातून कला ‘चैतन्य थाळी..!’

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य नाट्यचळवळ मालवण येथील स्वराध्या फाउंडेशनने कृष्णांक महोत्सव २०२२ चे ८ ते ९ जानेवारी २०२२ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे
आयोजन केले आहे. कै. रुक्मिणी कृष्णा नेवगी आणि कृष्णा पांडुरंग नेवगी यांच्या स्मरणार्थ स्वराध्याचा “कृष्णांक महोत्सव – २०२२ हा रंगमंचीय आविष्काराची पर्वणी ठरणार आहे. एकांकिका,दीर्घांक आणि नाटक अशा तिन्ही नाट्यप्रकारांचा एकत्रित महोत्सव असे या कृष्णांक महोत्सवाचे स्वरुप असणार आहे. शनिवारी ८ जानेवारी सायंकाळी ५ वाजता या कृष्णांक महोत्सवाचे औपचारिक उदघाटन सोहळा पार पडणार आहे. या महोत्सवाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता, संस्कार भारती, पुणे निर्मित ‘द प्लॅन/रॅन्ड वध, जॅक्सन वध या दीर्घांकाने होईल. या कलाकृतीचे लेखक – योगेश सोमण आणि दिग्दर्शन योगेश सोमण, रश्मी देव यांनी केले आहे
शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता समांतर सांगली, निर्मित “समांतर” ही लेखक दिग्दर्शक इरफान मुजावर यांची एकांकिका सादर होईल. त्यांनतर रात्रो ८.३० वाजता, इंडियन पीपल्स थिएटर अकादमी (ipta) पुणे निर्मित ‘मी भारतीय’ हा दीर्घांक सादर केला जाईल. याचे
लेखन प्रदिप तुंगारे आणि दिग्दर्शन रवींद्र देवधर यांनी केलं आहे.
रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी कृष्णांक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कलांकुर ग्रुप मालवण निर्मित सायलेंट स्क्रीम ही एकांकिका सादर होईल. याचे लेखन सिद्धार्थ साळवी तर दिग्दर्शन सचिन टिकम यांनी केले आहे.
सकाळी ११ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ निर्मित ‘आहे मनोहर तरी’ हा दीर्घांक सादर करण्यात येईल. या कलाकृतीचे लेखन आणि दिग्दर्शन वर्षा वैद्य यांनी केलं आहे.
दुपारी १२ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ निर्मित
‘बोझं’ ही एकांकिका सादर होईल. या एकांकिकेचे लेखन नागसेन सपकाळे तर दिग्दर्शन केदार सामंत यांनी केलंय.
महोत्सवाची सांगता सायंकाळी ७ वाजता अभिनय, कल्याण निर्मित, ‘सायलेन्स मॅटर चालू हाय’ या नाट्यकृतीने होणार आहे. यांचे लेखन कै.रमेश पवार /महेश निकम तर दिग्दर्शन अभिजित झुंजारराव यांचे आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स