ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
एसटी चालक सुहास हावुळ यांचे निधन

एसटी चालक सुहास हावुळ यांचे निधन

प्रकाशन: 12 Aug 2021 04:10 PM
वाचन संख्या 49

कणकवली | उमेश परब : फोंडाघाट महात्मा गांधी चौक येथील ग्रामस्थ, सुहास शंकर हावुळ (५१ वर्ष) यांचे मूत्राशयाचा दुर्धर आजाराने घरी दुःखद निधन झाले. ते कणकवली येथे एस.टी. विभागात चालक म्हणून कामास होते. गावातील विविध उपक्रमात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच एस. टी. चे डेपो मॅनेजर प्रमोद यादव, वाहतूक नियंत्रक निलेश लाड, स्थानक प्रमुख एस. टी. पवार आणि बाळा गोसावी, महेश भोगटे, सदू नांदोसकर या सहकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. एसटीच्या सेवेत कार्यरत असलेल्या सुहास यांचे पश्चात त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्याचे पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार असून येथील नामवंत टेलर डिगी हावुळ यांचे ते बंधू होत. त्यांच्या अकाली निधनाने परिसरामध्ये दुःख व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स