मुणगे येथील श्री भगवती प्रतिष्ठान कडून पत्रकारांचा सन्मान!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती प्रतिष्ठानच्या वतीने गावात कार्यरत पत्रकारांचा सन्मानपत्र व विठ्ठल रखुमाई मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच सौ. साक्षी गुरव यांनी सर्व पत्रकार बंधूंचे गावातील विकासात्मक गोष्टीत महत्वाचे योगदान लाभत असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार विश्वास मुणगेकर, गुरुप्रसाद मांजरेकर, शंकर मुणगेकर, प्रसाद बागवे, झुंजार पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. विश्वास मुणगेकर यांनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे सर्व पत्रकारांच्या वतीने आभार मानले. यावेळी पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, शिवदास रासम, श्री सोमनाथ रूपे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)