कानून के हात लंबे होते है
कणकवलीत आला प्रत्यय
कणकवली /उमेश परब – कणकवली तालुक्यातील बेळणे येथे महामार्गावर पादचाऱ्याला ठेकर देऊन पळून जाणाऱ्या स्कारपीओ चालकाला कणकवली पोलीस ठाण्यातील हवालदर मंगेश बावधाने व वाहतूक पोलीस नाईक सी.ए. माने यांनी प्रसंगावधान दाखवून शिताफीने पकडले. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास (एम.एच.०६ बीई ३७७२) स्कॉर्पिओ गाडी ही भरधाव वेगाने जालना येतून मालवणच्या दिशेने जात असताना बेळणे येथे एका व्यक्तीला ठोकर दिली.हा अपघात एवढा भयानक होता की ठोकलेल्या व्यक्ती जागीच बेशुद्ध पडली एवढी गंभीर जखमी झाली आहे. अजित अनजी सकपाळ रा.बेळणे असे जखमीचे नाव आहे.तर अपघात करणारा चालक याचे गोपाळ जाधव (राहणार जालना) असे नाव आहे.अपघात करणारा स्कॉर्पिओ चालक त्या ठिकाणी न थांबता पळून गेला.याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस हवालदार बावधाने यांना दिली. मग श्री. बावधाने हे गडनदी वर या गाडीला रोखण्यासाठी थांबले तर वाहतूक पोलीस नाईक माने हे जाणवली नदीवरील पुलावर थांबले.भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाला आपल्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला असल्याचे लक्षात येताच आणखीनच सुसाट वेगाने तो गोव्याकडे पळाला.कणकवलीत दोन्ही ठिकाणी हा पोलिसांनी प्रयत्न करून सुद्धा थांबला नाही.याची खबर ओसरगाव टोल नाका येथील वाहतूक पोलिसांनी देऊन त्याठिकाणी बॅरिकेट टाकून अखेर ही गाडी आडविली आणि ताब्यात घेण्यात आली.गुन्हा करून पळून असताना या गाडीला आणि त्याच्या चालकाला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यासाठी पोलीस हवालदर मंगेश बावधाने व पोलीस नाईक माने यांनी दाखविलेली तत्परता महत्वाची ठरली आहे.हवालदार बावधाने आणि माने सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)