ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग  या तारखेपासून बंद!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग या तारखेपासून बंद!

प्रकाशन: 05 Jan 2022 08:01 PM
वाचन संख्या 86

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा गुरुवार दिनांक 6 जानेवारी पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचनाही तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश आज सायंकाळी उशिरा निर्गमित केले आहेत.राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या चारपाच दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊन कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिक्षणाधिकारी मूस्ताक शेख, उपशिक्षणाधिकारी आंगणे व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 6 जानेवारी पासून पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स