सिंधुदिनांक
२ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
१८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.
१९३६: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.
१९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
१९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन
१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.
१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.
१९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये १४ इंच तर शिकोगामध्ये १९ इंच बर्फ पडला. शिकागोचे तापमान -१३°F इतके कमी झाले.
२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)