ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सकारात्मक कार्याची फळं आमदार नितेश राणेंना मिळतायत: नारायण राणे

सकारात्मक कार्याची फळं आमदार नितेश राणेंना मिळतायत: नारायण राणे

प्रकाशन: 28 Dec 2021 04:14 PM
वाचन संख्या 85

कणकवलीतील घटना किरकोळ…..?

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):सत्ताधारी आणि प्रशासन आमच्या विरोधात काम करत आहे. विनाकारण नितेशला गोवण्यात आले आहे.केवळ खरचटलं त्याला राज्याचे पोलीस महासंचालक व अतिरिक्त पोलीस महासंचालक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात,याचाच अर्थ दबावाखाली पोलिस काम करत आहेत.आ. नितेश राणे यांचा कोणताही संबंध नसताना गुन्हे दाखल केले गेले आहेत,आम्ही त्या विरोधात लोकशाही पद्धतीने कायदेशीर लढाई लढणार आहोत. जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आहे. मी देशाचा केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे त्यामुळे आम्ही मैदान सोडून पळणार नसल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांना दिला आहे.यावेळी नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहे का? पत्रकारांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.
कणकवलीत घडलेली घटना किरकोळ आहे, अशा महाराष्ट्रात अनेक घटना घडत असतात. उजव्या साईडला केवळ खरचटलं त्यासाठी कलम ३०७ पोलिसांनी लावले आहे. नितेश राणे यांना शोधण्यासाठी हेच पोलीस माझ्या हॉस्पिटल पोहचले. ज्या ठिकाणी माझी पत्नी बसली होती, त्या कार्यालयात जाऊन नितेश राणे कुठे आहेत? अशी विचारणा केली.हॉस्पिटलमध्ये पेशंट असतात,त्या हॉस्पिटलमध्ये काही रूम्स उघडून दाखवा,असेही असे सांगितले. ही पोलिसांकडून मिळणारी वागणूक चुकीचे आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक थेट माझ्या पत्नीला फोन करून नितेश राणे यांचा नंबर द्या,अशी मागणी करतात. अशा पद्धतीने चाललेल्या पोलीस कारवाईला आम्ही घाबरत नाही प्रशासन दबावाखाली काम करत आहे. सरकारने अशा पद्धतीने दबाव टाकून आमच्यावर रचत असलेले कटकारस्थान आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
ज्याने मार खाल्ला, जो मार खाऊन आला..त्याचा सत्कार केला जातो..आणि तो देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते,काय सांगावे. म्हणजेच तीन पक्षाचा सरकार कशा पद्धतीने चालते हे दिसून येत आहे. सत्तेचा आणि कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे. तिन्ही पक्षाचे नेते राज्याची लूट सरकारच्या माध्यमातून करत आहेत. कणकवली ज्या पद्धतीने भयानक कोणतीतरी घटना असे चित्र संपूर्ण महाराष्ट्र समोर दाखवण्याचे काम प्रशासन करत आहे,असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स