ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणकवली तालुक्यातील नांदगाव-मधलीवाडी प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ.प्रियांका भोगले यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

कणकवली तालुक्यातील नांदगाव-मधलीवाडी प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ.प्रियांका भोगले यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

प्रकाशन: 24 Dec 2021 11:32 PM
वाचन संख्या 38

या पुरस्काराचे वितरण ९ जाने. रोजी स.११ वा. गणपतीपुळे (रत्नागिरी ) येथे होणार आहे

शिरगाव/संतोष साळसकर : कणकवली तालुक्यातील नांदगाव-मधलीवाडी येथील प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ.प्रियांका विजय भोगले यांना सन २०२२ चा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. सौ प्रियांका भोगले यांचे मूळ गाव हे देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथे आहे.या पुरस्काराचे वितरण रवी.९ जाने. रोजी स.११ वा. गणपतीपुळे येथील हॉटेल दर्या सारंग पॅलेस येथे होणार आहे. अविष्कार फाउंडेशन ही सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा,आरोग्य,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने गणपतीपुळे(जि. रत्नागिरी) येथे प्रतिवर्षीप्रमाणे राज्य व राज्यस्तरावरील पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.सौ.प्रियांका भोगले यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.अशी माहिती अविष्कार फाउंडेशन इंडियाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संजय पवार व सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक सौ.स्मिता नलावडे यांनी माहिती दिली. सौ.प्रियांका भोगले यांना यापूर्वी गायिका आशा भोसले यांच्या हस्ते नाशिक येथे तसेच कणकवली पं. स.च्या वतीने सत्कार करण्यात आला होता.तसेच यावर्षी त्यांना रोटरी क्लब सिंधुदुर्ग चा गुणवंत शिक्षिका पुरस्कारही मिळाला होता. समूहगायन व नृत्य स्पर्धेत त्यांना अनेकदा जिल्हास्तरावर क्रमांक प्राप्त झाला असून त्यांनी मुलांची भजनेही बसवली आहेत. त्यांचे पती विजय भोगले यांनाही राज्यस्तरीय आदर्श पदवीधर शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स