ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
" नगराध्यक्ष चषक " वेंगुर्ले कब्बडी प्रिमीयर लीगचे नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते उद्घाटन.

" नगराध्यक्ष चषक " वेंगुर्ले कब्बडी प्रिमीयर लीगचे नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते उद्घाटन.

प्रकाशन: 23 Dec 2021 09:05 AM
वाचन संख्या 92

वेंगुर्ले/ विवेक परब : वेंगुर्ले तालुका कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने वेंगुर्ले नगरपरिषद पुरस्कृनगराध्यक्ष चषक २०२१ कब्बडी प्रिमीयर लीगचे उद्घाटन नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते करण्यात आले .
खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी आयोजित कब्बडी प्रिमीयर लीगचे प्रथम पारितोषिक ७००० , द्वितीय ४००० , तृतीय ३००० अशी बक्षीसे असुन वैयक्तिकही बक्षीसे असल्याने वेंगुर्ले तालुक्यातील नामवंत संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे .
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवुलकर , भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगरसेवक गटनेते सुहास गवंडळकर , नगरसेवक प्रशांत आपटे , क्रीडा शिक्षक जे.वाय.नाईक , प्रा.डाॅ. आनंद बांदेकर , संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण , कब्बडी असोसिएशनचे तुषार साळगांवकर व हेमंत गावडे , क्रीडा प्रशिक्षक जया चुडनाईक व जयराम वायंगणकर , तुळस सरपंच शंकर घारे , उपसरपंच जयवंत तुळसकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर तसेच संघमालक व क्रीडारसीक उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स