ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भावबंध कोकणचे' अनुभवताना रसिकांचे डोळे पाणावले : कवितांच्या नाट्याविष्काराला दाद
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भावबंध कोकणचे' अनुभवताना रसिकांचे डोळे पाणावले : कवितांच्या नाट्याविष्काराला दाद

प्रकाशन: 22 Dec 2021 06:00 PM
वाचन संख्या 30

कणकवली / उमेश परब – ‘भावबंध कोकणचे’ या डॉ. सई लळीत यांच्या कवितांच्या नाट्याविष्कार कार्यक्रमात वांगड, लास्टो पावस्, शबय, सोरगत, चाकरमानी अशा कवितांमधील भावबंध अनुभवताना रसिकांचे डोळे पाणावले. कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरुन दाद दिली.’घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेने निर्मिती केलेल्या या कार्यक्रमाचे काव्यलेखन, संहितालेखन, निवेदन आणि दिग्दर्शन डॉ. सई लळीत यांनी केले. रंगमंचावर एका बाजुला त्या स्वत:च्या मालवणी कवितांचे अभिवाचन करीत असताना त्याचवेळी कलाकारांनी त्या कवितांचा आशय अभिनयाद्वारे रंगमंचावर सादर केला. एकाचवेळी कवितांचे वाचन आणि त्यांचा रंगमंचीय आविष्कार होत असताना पडद्यावर अनुरुप छायाचित्रांचे दर्शनही घडविण्यात येत होते. कवितांच्या या दृश्य आविष्काराचा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांनी उचलून घेतला व प्रत्येक सादरीकरणाच्या शेवटी टाळ्यांच्या प्रचंड प्रतिसादात दाद दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेते अभय खडपकर यांनी नटराज पूजन करुन गाऱ्हाणे सादर केले. त्यानंतर ‘चाकरमानी’ ही कविता सादर झाली. चाकरमान्याच्या प्रतिक्षेत असणारी त्याची बहीण, आईवडील यांची तो येण्याची उत्सुकता आणि मुंबईला परतताना होणारी घालमेल याचे उत्कृष्ट दर्शन या कवितेतून घडविण्यात आले. निलेश पवार, अभय खडपकर, सुप्रिया प्रभुमिराशी, अदिती लळीत, सत्यवान गावकर यांनी ही कविता अभिनित केली. यानंतर सोरगत (मंगल राणे), बाशिंगबळ (श्रेयश शिंदे, प्रियांका मुसळे), हंड्रेड पर्सेन्ट (मंगल राणे, निलेश पवार), आज घरवाले येतले (श्रीया शिंदे), मऊसा चान्ना पडांदे (प्रियांका मुसळे), चालता हो (निलेश पवार, मंगल राणे), हाली ना माका हेंची खुप दया येता (कांचन खानोलकर, अभय खडपकर) या कविता सादर झाल्या आणि हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.दशावतारी नाटकातील राक्षसपार्टी सादर करणाऱ्या कलावंताचे मनोगत व्यक्त करणारी व राजकारणातील सद्यस्थितीचे भेसूर दर्शन घडवणारी ‘गोडो राक्षस’ ही कविता शरद सावंत यांनी राक्षसाच्या वेशभूषेत अप्रतिमपणे सादर केली. मी केवळ राक्षसाचे काम करणारा एक साधासुधा नट आहे, खरे भेसूर राक्षस समाजात कसे वावरत आहेत, याचे दर्शन घडविणारी ही कविता प्रेक्षकांना अंर्तमुख करुन गेली. ‘शबय’ या अतिशय तरल कवितेमधून शिमग्यातील ‘राधा’ बनून मुद्दामच आपल्या प्रेयसीच्या (आता विवाहीत) दारात येणारा प्रियकर राकेश काणेकर या उमद्या कलाकाराने रंगवला. त्याने ‘राधे’च्या स्त्रीवेशात सादर केलेली ही कविता प्रेक्षकांनी उचलून घेतली.मुंबईत रमलेल्या व आताशा गावी न येणाऱ्या आपल्या मुलाची वाट पाहणारी, त्यानेच दहा वर्षांपूर्वी दिलेल्या स्वेटरच्या ‘वांगडा’ने मुलखात एकटी दिवस कंठणारी एकाकी वृद्ध आई सुप्रिया प्रभुमिराशी यांनी समर्थपणे साकारली. तिचा एकाकीपणा, विवशता आणि दु:ख पाहून रसिक हेलावले. आयुष्याच्या उतारावर असलेला आणि यंदाचा पाऊस हा कदाचित शेवटचा असेल का, असा विचार करणारा वृद्ध अभय खडपकर यांनी ‘लास्टो पावस्’ या कवितेद्वारे कसदार अभिनयाने प्रत्यक्ष साकारला. हा पाऊस जर शेवटचाच असेल ती नवी छत्री घेऊ की नको, असे म्हणतानाची त्याची घालमेल रसिकांना अस्वस्थ करुन गेली. सत्यवान गावकर याने साकारलेला आणि प्रत्येक गावात दिसणारा ‘बाबी’ रसिकांच्या पसंतीला उतरला. गावातील प्रत्येकाला अडनडीच्या प्रसंगी जमेल तशी मदत करणाऱ्या मालवणी कॉमन मॅन ‘बाबी’ची भुमिका त्याने जिवंत केली.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, निर्मिती आणि छायाचित्रांचे सादरीकरण सतीश लळीत यांनी केले. पखवाजाची साथ अनीश ठाकूर याने दिली. राकेश काणेकर यांची वेशभूषा प्रशांत ठाकूर आणि भाग्यश्री मांजरेकर यांनी, तर राक्षसाची रंगभुषा दशावतारी कलावंत नारायण आईर यांनी केली. ध्वनीयंत्रणा डंबे बंधु यांनी, तर प्रकाशयोजना हृषिकेश कोरडे यांनी सांभाळली. कार्यक्रमाला वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रम संपल्यावर प्रेक्षकांनी रंगपटात येऊन कलाकारांचे भरभरुन कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स