ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हाबँक निवडणूक राजकीय स्वार्थ नाही तर लोकांचा फायदा हा आमचा उद्देश : आमदार नितेश राणे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हाबँक निवडणूक राजकीय स्वार्थ नाही तर लोकांचा फायदा हा आमचा उद्देश : आमदार नितेश राणे.

प्रकाशन: 22 Dec 2021 01:13 PM
वाचन संख्या 133

सिद्धिविनायक सहकार पॅनलला विजयी करण्याचे आवाहन

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांचा सिद्धिविनायक सहकार पॅनलला पाठिंबा आहे. अमित शहा यांना सहकार क्षेत्र मजबूत करायचे आहे विकसित करायचे आहेत. नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात जास्त फायदा सिंधुदुर्ग जिल्हाबँकला होणार आहे. शेतकरी सक्षम होतील रोजगार निर्मिती करता येईल यामुळे सिद्धिविनायक पॅनल ला विजयी करावे राजकारण करण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करण्यासाठी आपण निवडणूक लढवत नाही आहोत. आदर्श आचारसंहिता आपण पाळणार आहोत. कोणीही कितीही आरोप केले तरी आम्ही राजकीय बोलणार नाही. विकासात्मक बाबींवर आपण बोलणार आहोत. जे काही असेल ते ३० नंतर बोलू ही निवडणूक राजकीय नाही लोकांचा फायदा कसा होईल याकडे आमचे लक्ष असेल सहकार क्षेत्र विकसित व्हावे यासाठी आपले प्रयत्न असतील लवकरच आमचा जाहीर नामा प्रसिद्ध करू. असे आमदार नितेश राणे यांनीं सांगितले.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक सहकार पॅनल चे उमेदवार राजन तेली, अतुल काळसेकर, महेश सारंग, कामलांकत कुबल, दिलीपवरावरने, प्रकाश गोडस, विठ्ठल देसाई, प्रकाश मोरये, गुरुनाथ पेडणेकर, मनीष दळवी, प्रकाश गवस, गजानन गावडे, संदीप परब, समीर सावंत, अस्मिता बांदेकर, प्रज्ञा ढवण, गुलाबराव चव्हाण, सुरेश चौकेकर, रवींद्र मडगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले की, ३० डिसेंबर रोजी होणारी जिल्हाबँक निवडणूक आपण सिद्धीविनायक सहकार पॅनलखाली लढवत आहोत. आमचे १९ उमेदवार असून आमच्या पॅनलला कप बशी चिन्ह मिळालं आहे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाबँकेचा विकास झाला आहे. बँकेला झालेले सर्व फायदे हे केवळ नारायण राणे यांच्या मुळेच मिळाली आहे. विरोधकांनी केवळ पुस्तकात छापून श्रेय घेतलं आहे. कोणीही कितीही टीका केली आणि कितीही खोट बोलून श्रेय घेतलं तरीही सिद्धिविनायक सहकार पॅनलच्या १९ च्या १९ जागा निवडून आणणार आहोत.
स्वतःच्या स्वार्थासाठी सध्याच्या चेअरमन यांनी केले आहे. घाणेरडे राजकारण करून लोकांची दिशाभूल केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स