हळवल ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपची सरशी..!
भाजप पुरस्कृत उमेदवार सुदर्शन राणे ४३ मतांनी विजयी
कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):बिनविरोध असलेल्या हळवल ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक १ मधील सदस्याने राजीनामा दिल्याने पोट निवडणुक लावण्यात आली होती या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार सुदर्शन राणे हे तब्बल ४३ मतांनी विजयी झाले आहेत.
अत्यंत चुरशीच्या असलेल्या हळवल ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेना या दोन राजकीय पक्षात झाली होती. भाजप पुरस्कृत सुदर्शन राणे व शिवसेना पुरस्कृत नामदेव राणे या दोन उमेदवारात ही लढत झाली होती. या लढतीत शिवसेनेचा पराभव करत भाजपाने विजय मिळविला आहे. या विजयानंतर सुदर्शन राणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)