ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
6 सीटर मॅजिक रिक्षा स्टँड एसटी स्टँडसमोर..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

6 सीटर मॅजिक रिक्षा स्टँड एसटी स्टँडसमोर..!

प्रकाशन: 16 Dec 2021 12:49 PM
वाचन संख्या 67

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवली बसस्थानकासमोर सहा आसनी मॅजिक स्टॅन्डचा शुभारंभ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली नाटळ, दिगवळे, बोर्डवे, आंब्रड या भागात जाणाऱ्या प्रवाशांकरिता बसस्थानकासमोरील हे सहा आसनी मॅजिक स्टँड फायदेशीर ठरणार आहे. या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक धारकांकडून स्टॅन्डसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे व गोट्या सावंत यांच्या माध्यमातून या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी मॅजिक धारकांना एकाच छताखाली जागा देण्यात आली. यावेळी महापुरुष मॅजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण नगराध्यक्ष समीर नलावडे व गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मॅजिक चालक मालक उपस्थित होते. तसेच भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री सुशील पारकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स