ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिडीएस बिपीन रावत याना पेन्सिल स्केच मधून श्रद्धांजली!

सिडीएस बिपीन रावत याना पेन्सिल स्केच मधून श्रद्धांजली!

प्रकाशन: 11 Dec 2021 01:12 PM
वाचन संख्या 34
  • युवा कलाकार प्रणय पुजारेची भावनिक कृतज्ञता

मसुरे /प्राजक्ता पेडणेकर : तामिळनाडू मधील कुंनूर येथे नुकत्याच झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशावर या घटनेची शोककळा पसरली असून सर्वत्र जनरल रावत याना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रणय देवदत्त पुजारे या युवा पेन्सिल स्केच रेखाटणाऱ्या कलाकाराने पेन्सिल स्केच करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘देशाला तुमचा गर्व असल्याची भावना’ त्याने या पेन्सिल स्केच मधून व्यक्त केली आहे.मुणगे येथील श्री भगवती देवस्थान विश्वस्त व प्रसिद्ध भजनी बुवा, बांधकाम व्यावसाईक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांचा प्रणय हा मुलगा असून आयटीएम कॉलेज पनवेल येथे तो बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. डोकालाम प्रकरणी भूतान मध्ये भारतीय सैन्य घुसऊन चीनला मागे जाण्यास भाग पाडणारे, सर्जिकल स्ट्रइक करून पाकिस्तानला सणसणीत चपराक देणारे, लडाख मध्ये चीनला मूह तोड जबाब देणाऱ्या जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण देश शोकसागरात आहे. युवा कलाकार प्रणय देवदत्त पुजारे याने जनरल बिपीन रावत यांचे हुबेहूब पेन्सिल स्केच रेखाटत श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स