ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वागदे कसवण -तळवडे रस्ता  चतुर्थीपूर्वी  दुरुस्तीची नगरसेवक अबिद नाईक यांची मागणी.

वागदे कसवण -तळवडे रस्ता चतुर्थीपूर्वी दुरुस्तीची नगरसेवक अबिद नाईक यांची मागणी.

प्रकाशन: 11 Aug 2021 12:05 AM
वाचन संख्या 98

कणकवली / उमेश परब : दिनांक 22 ते 25 जुलै च्या दरम्यान झालेल्या अतीवृष्टीमुळे कणकवली तालुक्यातील वागदे कसवण तळवडे रस्ता प्राजिमा 31 किमी 2/500 येथे भूसंखलन होउन रस्त्याच्या मधोमध चार फुट खोल एव्हढा भाग खचला व रस्ता वाहतूकिला बंद झाला परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागने तात्पुरत्या स्वरुपाचा रस्ता तैयार करुण छोट्या वाहनांना वाहतुकीला मोकळा केला परंतु एसटी वाहतूक बंद असल्यामुळे त्या पंचक्रोशीतील लोकांना येण्याजान्या साठी खुप त्रास सहन करावा लागत आहे
त्याचबरोबर गणेश चतुर्थी हा सन जवळ आल्यामुळे एसटीची वाहतूक चालू होने गरजेचे आहे त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर विनायक जोशी व जूनियर इंजिनियर राहुल पवार यांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी भूस्खलन झालेल्या रस्त्याची पाहणी केली व अधिकाऱ्यांना येणाऱ्या आठ दिवसात एसटी वाहतूकीला रस्ता मोकळा झाला पाहिजे त्यासाठी लागणारी सर्व मदत आपण करू असे अबिद नाईक यांनी सांगितले. मागील दोन वर्षापासून रस्ता खचण्याचा प्रकार चालू असून त्यावर बांधकाम विभागने लक्ष देणे गरजेचे होते हे सबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले अधिकाऱ्यांनी आपण एसटी वाहतूकीला आठ दिवसात रस्ता मोकळा करुण देण्याचे आश्वासीत केले त्याचबरोबर ह्या डोंगरी रस्त्याच्या खचलेले काम लवकर होण्यासाठी उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब, पालकमंत्री ना. उदयजी सामंत साहेब सार्वजनिक बांधकाम कैबिनेट मंत्री ना. अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तामामा भरने साहेब यांच्या कड़े पाठपुरवा करणार असल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले
पाहणी करताना राष्टवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर विनायक जोशी ज्युनियर इंजिनिअर राहुल पवार, माजी राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष विलास गांवकर, माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत कसवण सरपंच सौ गीता तेली माजी राष्ट्रवादी जिल्हा ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, माजी शिवडाव उपसरपंच सतीश पाताडे कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़,सचिन सदडेकर, कणकवली राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, विशाल ठाणेकर, राजू वर्दम ,बाळू मेस्त्री, अंकुश मेस्त्री ,अरविंद पालव, बाबी गांवकर, महेन्द्र गांवकर आदि उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स