ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कणकवलीच्या कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार झाला प्रदान..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीच्या कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार झाला प्रदान..!

प्रकाशन: 30 Nov 2021 12:36 PM
वाचन संख्या 71

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस , कवयित्री ललिता सबनिस यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण..!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध यांच्यावतीने सिंधुदुर्गातील कणकवलीच्या कवयित्री तथा शिक्षिका सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ख्यातनाम साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस आणि कवयित्री ललिता सबनीस यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ.श्रीपाल सबनीस व ललिता सबनीस दाम्पत्याला राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने राष्ट्रीय सावित्रीजोति पुरस्कार माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ.सबनीस याना सत्यशोधकी पगडी बांधण्यात आली तर ललिता सबनीस यांना सावित्रीबाई महावस्त्र प्रदान करण्यात आले. महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला 27 नोव्हेंबर रोजी श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, जोतिबा यांच्याइतकेच महान कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे होते. विधवा ब्राम्हण स्त्रियांच्या बाळंतपणा ची जबाबदारी समाजसुधारक जोतिबांनी स्वीकारली होती . मात्र त्या विधवा ब्राम्हण महिलांचे बाळंतपण स्वतः सावित्रीबाई यांनी केले. यातून व अशा अनेक घटनांतून सावित्रीबाईंचे महात्म्य वेळोवेळी सिद्ध झाले आहे.जोतिबा महात्मा होते तर सावित्रीबाई म्हणजे महत्याम्याची महात्मा होती. यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संघटक डॉ. विजय ताम्हाणे, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ.अरुण आंधळे, प्रा. डॉ.संजय नगरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता झिंजूरके यांनी केले. आभार प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी मानले.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स