साळशी गावचे पत्रकार राजेंद्र साळसकर यांना राष्ट्रीय स्तरावरील 'संजीवन पुरस्कार...!'
आज सांगली येथे पुरस्कार वितरण सोहळा
शिरगांव / संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी गावचे सुपुत्र तथा जेष्ठ पत्रकार मुंबई येथील बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती चे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यांना सांगली येथील बाॅम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन, भारत या संस्थेच्यावतीने संजीवनी पुरस्कार २०२१ हा नॅशनल ॲवाॅर्ड जाहीर झाला आहे.आज मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सांगली येथे एका समारंभाद्वारे प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराबद्दल राजेंद्र साळसकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.साळसकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रासोबतच इतर सामाजिक क्षेत्रातही उतुंग अशी कामगिरी केली आहे.यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)