ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अनुष्का पाटीलची जुनियर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी...!

अनुष्का पाटीलची जुनियर जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी...!

प्रकाशन: 29 Nov 2021 05:01 PM
वाचन संख्या 51

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथील जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक विशाल कटकदौंड  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी अनुष्का पाटील हिने जम्मू काश्मीर येथील तिच्या पाहिल्याच जुनियर नॅशनल आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बॅलन्सिंग बीम या क्रिडा प्रकारात सुवर्ण पदकासहित महाराष्ट्रासाठी महिलांच्या सांघिक रौप्य पदकाची कमाई केली आहे. वैयक्तीक पाचवा क्रमांक गाठून खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघात आपला पहिला प्रवेश निश्चित केला आहे.
तर मुलांच्या संघात निशांत करंदीकर आणि सार्थक राऊळ यांनीही प्रशिक्षक शुभम गिरी सोबत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून दिले आहे.
आता याबद्दल प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभागाच्या प्रमुख), पालक आणि संपूर्ण प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या सर्व परिवाराचे आभार आणि अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स