ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आचरा गाऊडवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव व श्री दत्त जयंती उत्सव होणार साजरे..!

आचरा गाऊडवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव व श्री दत्त जयंती उत्सव होणार साजरे..!

प्रकाशन: 29 Nov 2021 11:09 PM
वाचन संख्या 89

आचरा | अनिकेत पांगे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री दत्त मंदिर ,आचरा गाऊडवाडी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव व श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्त प्रासादीक मंडल आचरा,गाऊडवाडी यांच्या वतीने श्री दत्त मंदिर आचरा येथे करण्यात आले आहे. प्रथम श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सवाचे आयोजन ३० नोव्हेंबर २०२१ ते २ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे. करण्यात आले आहे. यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा स्थापना व पूजन, आरती भजने ,सुश्राव्य किर्तन, इतर भक्तीमय कार्यक्रम ,जेष्ठ नागरीकांना भक्तीगीत कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच समारोप दिनी दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ८.०० या धार्मिक विधींचा कार्यक्रम होणार आहे.
त्याचसोबत शुक्रवार दि. १७ डिसेंबर २०२१ रोजीपासून प्रथेप्रमाणे निशाण फेरी काढून श्री दत्त जयंती उत्सवास प्रारंभ होणार असून शनि दि १८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी श्री दत्त माऊलींना अभिषेक, पूजा, महाप्रसाद व स्थानिक भक्तीमय तथा करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भक्तांनी या दोन्ही कार्यक्रमांस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे श्री दत्त प्रासादीक मंडळ, आचरा गाऊडवाडी यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स