ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
त्रिंबकच्या डाॅक्टर सिद्धेश सकपाळ यांच्या रुग्णालयात मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबीर.. !

त्रिंबकच्या डाॅक्टर सिद्धेश सकपाळ यांच्या रुग्णालयात मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबीर.. !

प्रकाशन: 28 Nov 2021 10:08 AM
वाचन संख्या 213

आचरा | अनिकेत पांगे : “कोकणातील माणूस फणसासारखा असतो असे म्हणतात. वरून काटेरी आतून गोड.तोंडावर मिश्किलसे हलके फुलके भाष्य करुन समोरच्या व्यक्तीला विचार करायलाही लावेल पण त्याच्या गरजेला मदत म्हणून रात्री अपरात्री धावून स्वभावातला गोडवा दाखवून देईल. पण हल्ली या धकाधकीच्या जीवनात स्वभावासोबत रक्तातला गोडवा सुद्धा वाढलेला पाहायला मिळतो.म्हणजेच हल्ली मधुमेह हा आजार बळावल्याचे प्रमाण आपल्याला लोकांमध्ये वाढलेले पाहायला मिळते” याबाबत जागृती व उपचारांची माहिती या उद्देशाने डॉ. सिद्धेश सकपाळ व त्यांचे सहकारी त्रिंबक यांच्या प्रयत्नाने मोफत मधुमेह तपासणी मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 त्यांच्याच दवाखान्यात आयोजित करण्यात आले आहे.तपासणी व त्यावर उपचार तसेच प्रतिबंधक मार्गदर्शन हा या शिबिराचा मूळ हेतू आहे.
त्याशिवाय हातापायातील सुन्नपणा, जळजळ हा आजार सध्या वरचे वर दिसून येतो. पायामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होतेय की नाही हे पडताळून पाहण्यासाठीसुद्धा काही मशीनद्वारे मोफत चाचणी करण्यात येणार आहे.
मधुमेह तपासण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी कृपया उपाशीपोटी यावे जेणेकरून आपणास व्यवस्थित चाचणी करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे डाॅक्टर सिद्धेश सकपाळ व सहकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स