ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओरोस येथे २६ नोव्हेंबर रोजी खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी प्रशिक्षण केंद्र निवड चाचणी..!

ओरोस येथे २६ नोव्हेंबर रोजी खेलो इंडिया अंतर्गत कबड्डी प्रशिक्षण केंद्र निवड चाचणी..!

प्रकाशन: 24 Nov 2021 09:54 AM
वाचन संख्या 38

पहिल्या चाचणीला मिळाला होता अल्पप्रतिसाद…!

जास्तीतजास्त मुलामुलींनी संधीचा लाभ घेण्याचे जिल्हा क्रिडा अधिकार्यांचे आवाहन

ओरोस | प्रतिनिधी :क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता  कबड्डी या खेळ प्रकाराचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रसाठी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आलेली होती या निवड चाचणीस खेळाडूंचा अल्प प्रतिसाद असल्याने पात्र खेळाडू प्राप्त न झाल्याने पुनश्च दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ राजी सकाळी ९ वाजता खेला इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कबड्डी खेळाडुंची निवडचाचणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या निवड चाचणीस खेळाडूंसाठी वयोमर्यादा ८ ते १२ वर्षाखालील मुले, मुली ही आहे. खेळाडुंनी निवड चाचणीस येताना कबड्डी किट तसेच जन्म तारखेचा पुरावा आधारकार्ड, जन्मदाखला सोबत आणणे आवश्यक आहे.
खेळाडुंना खेलो इंडिया अंतर्गत मिळणार्या संधीचा राष्ट्रीय स्तरापर्यंत व पुढेही असल्याने या चाचणीला जास्तीतजास्त मुलामुलींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकार्यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स