गराजलो रे गराजलो नाट्यचळवळीमार्फत प्रगत शेतकर्याची होणार लाईव्ह मुलाखत...!
फेसबुकपेजवरुन होणार लाईव्ह.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील भूमिपुत्रांच्या जागृतीसाठी प्रयत्न करीत असलेल्या सोमेश्वर कलामंच आणि गराजलो रे गराजलो चळवळीअंतर्गत संपूर्ण वर्षभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. फेसबुक लाईव्ह या सामाजिक मंचावरुनही त्याचे जागरण केले जाते. कोकणातील क्रियाशील व्यक्तींना मुलाखत स्वरुपात आमंत्रित करून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचवले जातात.
ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजेच लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र हा उपक्रम!
या उपक्रमाअंतर्गत बुधवार
दिनांक २४नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ठीक ०८.०० वाजता लाईव्ह प्रसारित होत आहे.
मुलाखतकार कु.उज्वल सावंत ह्य्
प्रगत शेतकरी श्री तानाजी सावंत यांच्याशी आधुनिक शेती अवजारांची निर्मिती यांवर लाईव्ह मुलाखत चर्चा करणार आहेत.
तरी, जास्तीत जास्त आपल्या सर्व बांधवांनी याचा बोध घ्यावा, जागृत व्हावे आणि या चळवळीमध्ये सामिल होऊन आम्हाला सहकार्य करावे. तसेच प्रत्येक कोकणी माणसाने ही मुलाखत पहावी.
page:https://www.facebook.com/गराजलो-रे-गराजलो-102117271370970/ या लिंकवर अवश्य पहावी असे आवाहन सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष श्री.सहदेव धर्णे (मुंबई) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)