ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेवंडीच्या श्री भद्रकाली देवीचा जत्रोत्सव २२ नोव्हेंबर रोजी!

रेवंडीच्या श्री भद्रकाली देवीचा जत्रोत्सव २२ नोव्हेंबर रोजी!

प्रकाशन: 21 Nov 2021 07:29 PM
वाचन संख्या 57

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील रेवंडी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी भद्रकालीचा वार्षिक जत्रा उत्सव उध्या २२ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.या निमित्ताने सकाळी ८ वाजल्या पासुन रात्रौ ७ वाजेपर्यत ओटी भरणे कार्यक्रम, नंतर रात्रौ १०वा श्री देवीचा पालखी सोहळा, होणार असून पालखी सोहळ्यानंतर पुन्हा देवीची ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे. रात्रौ १२ वा बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतारी नाटक होणार आहे. पहाटे पुन्हा पालखी असून कोरोना महामारी प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे या वार्षिक जत्रोत्सवास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री भद्रकाली देवस्थान कमिटीने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स