श्री देव नारायण मंदिर वार्षिक जत्रोत्सव उद्या दिनांक 21 नोव्हेंबर रोजी..!
मंदिराची नूतन वास्तू ठरते आहे भाविकांचे आकर्षण..!
पोईप | ओंकार चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध व साडेसतरा खेड्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेल्या मालोंड बेलाचीवाडी गावच्या श्री देव नारायण मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दि 21 नोव्हेबर रोजी संपन्न होत आहे. यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यामध्ये श्री देव नारायणाची विधिवत पूजा पालखी मिरवणूक, माहेर वासिनी, सुहासिनी यांचेकडून देवाची ओटी भरण्याचा कार्यक्रम, भाविक भक्तांची गाऱ्हाणी नवस, व श्री देव नारायणाच्या पालखी तरंगासह मंदिर प्रदक्षिणा तर रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. प्रतिवर्षी या सुप्रसिद्ध वार्षिक धार्मिक उत्सवाला हजारो भाविक चाकरमानी हजेरी लावून देवाच्या दर्शनाचा व जत्रोत्सवाचा लाभ घेतात. या वर्षी आकर्षक विद्युत रोषणाई बरोबरच श्री देव नारायण मंदिराची नूतन वास्तू हे खास आकर्षण ठरणार आहे. तरी या संपूर्ण जत्रोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)