ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आम. वैभव नाईक यांची    पंचायतराज समिती दौऱ्यादरम्यान जि.प.सिंधुदुर्गमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची मागणी ...!

आम. वैभव नाईक यांची पंचायतराज समिती दौऱ्यादरम्यान जि.प.सिंधुदुर्गमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची मागणी ...!

प्रकाशन: 18 Nov 2021 05:20 PM
वाचन संख्या 46

पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर यांची आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत केली मागणी

पंचायतराज समितीचे अध्यक्ष शिवसेना सदस्यांसोबत साधणार संवाद

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत भेट घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांचे लक्ष वेधले. पंचायत राज समिती 30 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये वॉटर प्युरिफायर सह अन्य अनेक योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचारा संदर्भात लक्ष वेधताना या सर्व भ्रष्टाचाराची तपासणी पंचायतराज समितीच्या दौऱ्यादरम्यान व्हावी अशी मागणीही आ.वैभव नाईक यांनी समितीचे अध्यक्ष आमदार रायमुलकर यांच्याकडे केल्याची माहिती दिली. दरम्यान या मागणीनुसार डॉ. रायमुलकर यांनी या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पंचायतराज समितीच्या तपासणी पूर्वी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन आढावा घेतला जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांना दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स