ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन...

पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन...

प्रकाशन: 18 Nov 2021 02:26 PM
वाचन संख्या 107

ओरोस | प्रतिनिधी : पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी प्रश्नांचे व समस्यांचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी गोवा पोस्टल क्षेत्रीय कार्यालयातर्फे पेन्शन अदालतचे आयोजन केले आहे. ज्या मध्ये गोवा राज्य, महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. पोस्टमास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा येथे बुधवार दिनांक 1 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी दुपारी 12.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आलेली आहे                                        डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तत्कारींची या डाक पेन्शन अदालन मध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे.
उत्तराधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तत्कारी पेंन्शन अदालत मध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. उदाहरणार्थ तारीख व ज्या अधिकाऱ्यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. संबंधितांनी पेंन्शन बाबतची आपली तक्रार श्री एरीक्सन पी.सॅम्युअल सहाय्यक लेखाधिकारी, सचिव पेन्शन अदालत, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा कार्यालय,यांचे नाव अतिरिक्त प्रति सह दिनांक http://localhost/news/public/uploads/20 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर प्राप्त आलेल्या अर्जांचा पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही .अशी माहिती अधीक्षक  डाकघर सिंधुदुर्ग विभाग यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स