शिरगांव निमतवाडीअंतर्गत थोरबोलवाडी-आईरवाडी कोरोनाबाधित क्षेत्र ; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
शिरगांव /प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील शिरगांव-निमतवाडी येथे ७ ऑगस्ट पर्यंत १८ कोरोना रुग्ण आढळून आल्याने शिरगाव – शेवरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचानी तालुका आरोग्य अधिकारी,तहसीलदार,पोलिस ठाणे देवगड यांना लेखी पत्र देऊन निमतवाडी येथे कोरोना बाधित प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करावे अशी मागणी केली होती.त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी एका आदेशान्वये १५ ऑगस्ट पर्यंत निमतवाडीतील भाग असलेल्या थोरबोलेवाडी व आईरवाडीपुरते क्षेत्र कोरोनाबधित म्हणून जाहीर करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून साथ रोगअधिनियम १८९८ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार निमतवाडीअंतर्गत थोरबोलेवाडी व आईरवाडीपुरते कोरोनाबधित क्षेत्र म्हणून २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत घोषित करण्यात आले आहे.त्या घर परिसरात नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे अवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे. हे आदेश अत्यावश्यक सेवा यात सार्वजनिक वितरण व्यवस्था,वैद्यकीय उपचार व्यवस्था,बँका आदि वितरित करणारे सेवा देणारे अधिकारी कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू रहाणार नाहीत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम५१व५८ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१,१३९ तसेच भारतीय दंड संहिता (४५ऑफ१८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.असे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)