कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक..
कणकवली शहर व जिल्ह्यातील सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रात होतोय शोक व्यक्त….!
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे ( रा.कणकवली बाजारपेठ ) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, विवाहित मुली, जावई , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कणकवली शहर व जिल्ह्यातील सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातही शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)