ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कणकवली येथे 21 नोव्हेंबर रोजी शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा...
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवली येथे 21 नोव्हेंबर रोजी शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा...

प्रकाशन: 17 Nov 2021 08:27 PM
वाचन संख्या 69

माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती

कणकवली / उमेश परब : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात रविवारी २१ नोव्हेंबरला सकाळी 10.30 वा शोकसभा
होणार आहे. या सभेत सर्व लोकप्रतिनिधी, विविध
कलामंडळे आणि पुरंदरे प्रेमींनी उपस्थित राहावे असे
आवाहन मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम
उपरकर यांनी केले आहे.श्री.उपरकर म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नितांत प्रेम होते. त्यामुळेच त्यांनी जाणता राजा
महानाट्याचा प्रयोग कणकवलीत केला. तसेच शिवरायांच्या
जीवन कार्यावर आधारीत व्याख्यानमाला दिली. अनेक
शाळा, शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांनाही बाबासाहेब पुरंदरे
उपस्थित राहिले आणि मार्गदर्शन केले. तसेच सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील कुठलाही कार्यक्रम असला तरी बाबासाहेब सहज उपलब्ध होत असतं एवढं प्रेम त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर केलं होतं.
श्री. उपरकर म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी महिन्यापूर्वीच दिवाळी सणात सिंधुदुर्गात येण्याचे मान्य केले होते. मात्र घरात झालेल्या एका अपघातामुळे ते जखमी झाले आणि त्यांचा सिंधुदुर्ग दौरा अपूर्ण राहिला. लवकरच त्यांच्या अस्थि सिंधुदुर्गात आणल्या जाणार आहेत. दरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी सिंधुदुर्गातील अनेकजण जोडले गेले होते. यासर्वांनी रविवारी २१ रोजी कणकवलीत होणाऱ्या शोकसभेला अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान निधनानंतर आपल्या अस्थी कुठल्या तरी किल्ल्यावर विशेषत: सिंधुदुर्ग किल्ल्यावर विसर्जित व्हाव्यात अशी अपेक्षा बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या कुटुंबियांकडे व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या अस्थी सिंधुदुर्ग किल्ल्यावर विसर्जित होणार आहेत. त्याचा कार्यक्रमही नंतर ठरवला जाणार असल्याची माहिती मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स