ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण रेल्वेचे शिल्पकार व उत्कृष्ट संसदपटू मधू दंडवते यांचा 16 वा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण रेल्वेचे शिल्पकार व उत्कृष्ट संसदपटू मधू दंडवते यांचा 16 वा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 12 Nov 2021 12:02 PM
वाचन संख्या 70

कणकवली | उमेश परब : “मानवसुलभ व सुयोग्य दळणवळण यातूनच विकास साधणे शक्य आहे” हे ओळखूनच कोकण सारख्या मागास भागात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेची उभारणी केली असे प्रतिपादन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले. त्या कोकण रेल्वे कर्मचारी आणि आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने कणकवली रेल्वे स्टेशन येथे संपन्न झालेल्या मधु दंडवते यांच्या सोळाव्या स्मृतिदिनी बोलत होत्या . कोकण रेल्वेचे अशक्य स्वप्न प्राध्यापक मधु दंडवते यांनी सत्यात उतरवले आणि कोकण विकासाचा मार्ग प्रशस्त केला असे त्या पुढे म्हणाल्या .
स्वर्गीय मधु दंडवते 1970 – 71 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते 1971 ते 1990 या कालावधीमध्ये दंडवते राजापूर लोकसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा खासदार होते .या दीर्घ कालावधीत त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळला होता . 21 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2005 ही सुमारे ऐंशी वर्षांची समर्पित जीवनाची कारकीर्द त्यांची होती .तत्व निष्ठेने जगणाऱ्या दंडवते यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा कधीच घेतली नव्हती . सर्वसामान्यांमध्ये ते ” नाना ” या नावाने परिचित होते. उच्च नैतिकता आणि साधनशुचिता यांचा त्यांनी कायमच आग्रह धरला होता .


कणकवली येथे संपन्न झालेल्या दंडवते यांच्या स्मृती दिन कार्यक्रमाला कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने , ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , विजय गांवकर , संजय मालंडकर , सादिक कुडाळकर , बाळू मेस्त्री ,आबा तेली , ऍड .प्रकाश पावसकर , उमेश वाळके तर कोकण रेल्वेचे पवन जोशी , शिवाजी शिंदे , संजय खरविले , संतोष बापट ,प्रशांत सावंत ,संतोष कदम, भाई परब , भाऊ चीरेकर, प्रशांत तांबे संजय पाटील आदी उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स