महामार्गावर बॅरिकेटस बसविण्याच्या कामाला झाली सुरुवात...!
ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलादरम्यान पादचारी पथ तयार करणे व बॅरिकेट्स बसविणे या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी पंचायत समिती कणकवलीचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती श्री. दिलीप तळेकर, तळेरे माजी सरपंच श्री. शशांक तळेकर, तळेरे उपसरपंच श्री. दिनेश मुद्रस, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश जाधव, श्री. रोहित महाडिक, श्री. बली तळेकर, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नलगे, के सी सी ठेकेदार कंपनीचे श्री. द्विवेदी आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)