ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाहन इंधन दरवाढीविरोधात देवगड भाजपने दिले तहसीलदारांना निवेदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वाहन इंधन दरवाढीविरोधात देवगड भाजपने दिले तहसीलदारांना निवेदन.

प्रकाशन: 12 Nov 2021 09:37 AM
वाचन संख्या 56

ब्युरो न्यूज | विवेक परब : वाढत्या डिझेल पेट्रोलचा दरवाढीविरोधात देवगड भारतीय जनता पक्षाने देवगड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या आर्थिक ओढातानीची दखल घेऊन केंद्र सरकारने पेट्रोल 7 रुपये व डिझेल 10 रुपये या प्रमाने करात कपात केली आहे. तसेच भाजपा प्रणित राज्य सरकारांनी देखील या निर्णयाची दखल घेत पेट्रोल व डिझेल वर सर्वसाधारण पणे प्रत्येकी 7 रुपये कपात केली आहे. त्यामुळे एकूण दरात पेट्रोलवर 12 रुपये आणि डिझेलवर 17रुपये कपात झाली आहे. आपल्या शेजारच्या गोवा आणि कर्नाटक सरकारने देखील ही कपात केली आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल व डीझेल मुद्द्यांवरून आंदोलन व मोर्चा काढतात पण पेट्रोल व डिझेल विक्रीतून राज्य सरकारला मिळणाऱ्या कराच्या वाट्यात कपात करून सर्वसामान्यांना कुठलाही दिलासा देत नाहीत हे निषेधार्ह आहे.
या निवेदनाद्वारे आम्ही आपणास कळवू इच्छितो की केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीला या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल याची गंभीर नोंद घ्यावी व पेट्रोल व डीझेलच्या दरात तात्काळ कपात करावी. असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर पडेल मंडल तालुकाध्यक्ष अमोल तेली,तालुका सरचिटणीस शरद ठुकरुल, प्रियंका साळसकर, भाजप शहराध्यक्ष योगेश पाटकर, सभापती रवी पाळेकर, प्राजक्ता घाडी, राजा वालकर,आदी पदाधिकारी उपस्थितीत होते,

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स