ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्यावतीने पु.लंच्या 'तुका म्हणे आता' या नाटकाचा होतोय शुभारंभ..!

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्यावतीने पु.लंच्या 'तुका म्हणे आता' या नाटकाचा होतोय शुभारंभ..!

प्रकाशन: 11 Nov 2021 08:44 PM
वाचन संख्या 114

रघुनाथ कदम दिग्दर्शित व स्वाती राजेंद्र कदम यांची निर्मिती..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित कलावंतांना जम बसवण्यासाठी उचलले पाऊल…!

कणकवली | उमेश परब : पु.ल.देशपांडे लिखित आणि श्री. रघुनाथ कदम दिग्दर्शित व स्वाती राजेंद्र कदम निर्मित ‘तुका म्हणे आता’ ही नाट्य कृती लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे.
गेली अनेक वर्षे नाट्य क्षेत्रात अनेक नावीन्य पूर्ण कलाकृती सादर करणाऱ्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी तुका म्हणे आता या नाटकाचा शुभारंभ प्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित यांनी दिली आहे. वसंतराव आचरेकर कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष एन आर देसाई, कार्यवाह शरद सावंत, सहकार्यवाह राजेश राजाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य प्रसन्न देसाई, अभिनेते राजेंद्र कदम आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीत पाय रोवता यावा म्हणून हे नाटक व्यावसायिक स्वरूपात असणार आहे. १३ रोजी कणकवली येथे तर १४ तारीखला मालवण येथे प्रयोग होणार आहेत. नेहमीच यशस्वी प्रायोगिक नाटक सादर करणाऱ्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे व्यवसायिक नाटकात पहिलेच पाउल आहे. तब्बल दोन वर्षांनंतर  रंगभूमीवरचा पडदा उघडणार असून याचे सर्व श्रेय हे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानला जातेय.
‘तुका म्हणे आता’ संगीत नाटकाची निर्मिती स्वाती राजेंद्र कदम यांनी केली असून दिग्दर्शन रघुनाथ कदम, नेपथ्य अंकुश कांबळी, प्रकाशयोजना संजय तोडणकर, संगीत- मंगेश कदम, मृदुंग, तबला- वैभव मांजरेकर, रंगभूषा, वेशभूषा- तारक कांबळी, नेपथ्यनिर्माण अजय पुजारे, रमेश सुतार, रंगमंच व्यवस्था- रवी सावंत, सूत्रधार एडव्होकेट एन. आर. देसाई असून यामध्ये कलाकार- श्याम नाडकर्णी, शरद सावंत, राजेंद्र कदम, सुदिन तांबे, विकास कदम, कुणाल आंगणे, पंकज कदम, सुविधा कदम, प्रियांका मुसळे यांनी भूमिका बजावल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स