ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक डोसचे   लसीकरण झाले आठ लाख ,आठ हजाराच्या पार ....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक डोसचे लसीकरण झाले आठ लाख ,आठ हजाराच्या पार ....!

प्रकाशन: 09 Nov 2021 11:29 PM
वाचन संख्या 46

ओरोस | प्रतिनिधी : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 26 हजार 83 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 9 हजार 846 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 116 जणांनी दुसरा डोस घेतला.  9  हजार 937 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 781 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 29 हजार 98 व्यक्तींनी पहिला डोस तर 82 हजार 916 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 52 हजार 28 नागरिकांनी पहिला डोस तर 93 हजार 177 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 25 हजार 174 जणांनी पहिला डोस तर 89 हजार 669 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 8 हजार 742 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.                                 जिल्ह्याला आजपर्यंत एकूण  8  लाख 21 हजार 340  लसी  प्राप्त  झाल्या  असून त्यामध्ये  6 लाख 29 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 92 हजार 160 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 6 लाख 30 हजार 351 कोविशिल्ड आणि 1 लाख 78  हजार 391  कोवॅक्सिन असे मिळून 8 लाख 8 हजार 742 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 38 हजार 300 लसी उपलब्ध असून त्यापैकी 25 हजार 900 कोविशिल्डच्या आणि  12 हजार 400 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 18 हजार 660 लसी शिल्लक असून त्यापैकी  15 हजार 250  कोविशिल्ड आणि 3 हजार 410 कोवॅक्सीनच्या लसी  शिल्लक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य खात्याच्या सूत्रांनी ही माहिती देत लसीकरणावर आणखी भर द्यायचा उद्देश स्पष्ट केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स