ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवाने नूतनीकरणासंबंधी अपर जिल्हा दंडाधिकार्यांचे आवाहन...!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवाने नूतनीकरणासंबंधी अपर जिल्हा दंडाधिकार्यांचे आवाहन...!

प्रकाशन: 08 Nov 2021 08:39 PM
वाचन संख्या 159

ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना  कळविण्यात येते की, ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्याचे नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या सेतू सुविधा केंद्रात दुपारी 1.00 वाजेपर्यंत आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
शस्त्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form-A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा. (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे.)  मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा.  परवाना नुतनीकरण करीता फी रु. 2500/- (रुपये दोन हजार पाचशे फक्त) शासन जमा करणे आवश्यक आहे.  शस्त्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांचेकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र.  सरपंच/ पोलीस पाटील/नगराध्यक्ष यांचेकडील दाखला.  अर्ज पोस्टाव्दारे किंवा तालुक्याचे ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत.
एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून तालुकानिहाय नेमलेल्या तारखांनाच त्या त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे. सावंतवाडी 1 ते 3 डिसेंबर , दोडामार्ग 6 ते 8 डिसेंबर, वेंगुर्ला 9,10 डिसेंबर, मालवण 13 ते 15 डिसेंबर , वैभववाडी 16, 17 डिसेंबर , कणकवली http://localhost/news/public/uploads/20 ते 22 डिसेंबर, कुडाळ 23, 24, 27 डिसेंबर, देवगड 28 ते 30 डिसेंबर अशा प्रकारे या तारखेला जिल्ह्यातील त्या त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे. संबंधित परवानाधारकांनी याची नोंद घेऊन नेमून दिलेल्या दिवशी व वेळी (सार्वजनिक सु्ट्या वगळून) वरीलप्रमाणे कार्यवाही करावी असे अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स