ताज्या बातम्या
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. कणकवलीत गिरिजा प्रभुदेसाई यांचा 'कथक' नृत्य वंदना कार्यक्रम. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात. पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश. रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी. मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात.
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश.

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश.   

Article image


संस्था अध्यक्ष डॉ दीपक परब, सचिव प्रसाद बागवे, मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब आणि मुंबई कमिटी उपाध्यक्ष उत्तम राणे यांच्याकडून अभिनंदन.  


मसुरे | प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आर. पी. बागवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. 

​शिरवंडे येथे झालेल्या ह्या स्पर्धेत भार्गव शैलेश ठाकूर (१४ वर्षे वयोगट - मुले) याने ​गोळा फेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक तर ​उंच उडी क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकवला आहे. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ​कु. श्रेया महेश वंजारे (१४ वर्षे वयोगट - मुली) हिने मैदानी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. 


यशस्वी विध्यार्थ्यांना श्री. रमेश पाताडे, श्रीमती जाधव मॅडम आणि श्री. समीर नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. 


संस्था अध्यक्ष डॉ दीपक परब, सचिव प्रसाद बागवे, मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर, लोकल कमिटीचे अध्यक्ष श्री. राजन परब आणि मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष श्री. उत्तम राणे यांनी मार्गदर्शक क्रीडा शिक्षक आणि शिक्षक व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स