ताज्या बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मधील दिग्गज सत्कारमूर्तींची नामावली जाहीर. मालवणच्या श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्गच्या ३६२ व्या पायाभरणी सोहळ्यानिमित्त शासकीय पूजा उत्साहात. टीम 'शीतल'च्या गस्तीची वाढती धास्ती ....! 'गाथेचे पुस्तकांनी वंदन...!' मालवण ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव आणि श्री देव नारायण जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा.

जाहिरात

सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मधील दिग्गज सत्कारमूर्तींची नामावली जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मधील दिग्गज सत्कारमूर्तींची नामावली जाहीर.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मधील दिग्गज सत्कारमूर्तींची नामावली जाहीर.



बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित 'महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित' संमेलनाची उत्कंठा वाढली.

मालवण | प्रतिनिधी : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित 'महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अनुदानित संमेलनाची उत्कंठा वाढत असतानाच आयोजक - नियोजकांच्या वतीने ह्यातील दिग्गज सत्कारमूर्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. मालवण परिसरातील साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १९ साहित्यिकांचा सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन – २०२६ मध्ये विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून आदर्श बाल वाचक आणि आदर्श मोठा वाचक यांचाही गौरव करण्यात येणार आहे.‘माझा काळ, माझी भूमिका’ ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ग्रंथदिंडी, स्थानिक कवी संमेलन, निमंत्रित कवी संमेलन, मुलाखती, विविध साहित्यिक स्पर्धा आणि वैचारिक कार्यक्रम असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.


मालवण परिसरातील साहित्यिकांचा सन्मान करताना त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेतली जाणार आहे. या सोहळ्यात वैशाली पंडित, ऋषी देसाई, रुजारिओ पिंटो, प्रफुल्ल देसाई, डॉ. विवेक रेडकर, विनायक कोळंबकर, कमलेश गोसावी, नंदकिशोर महाजन, राजेंद्र खांडाळेकर, मंदार सांबारी, अरविंद म्हापणकर, रवींद्र वराडकर, संध्या तांबे, मेघना जोशी, शुभदा पेडणेकर, उमेश कोदे, सुरेश ठाकूर, संदीप चिपकर व अन्य अशा वैविध्यपूर्ण सत्कारमूर्तींच्या गौरवक्षणांना अनुभवायची उत्कंठा वाढत जात असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स