ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..! मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. कणकवलीत गिरिजा प्रभुदेसाई यांचा 'कथक' नृत्य वंदना कार्यक्रम. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात. पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.
मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन.

मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन.


छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या 'तत्व - सत्व आणि कर्तृत्व' जाणीवांसह पवित्र हिंदू धर्म, समृद्ध भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम, जीवनमूल्ये आणि जाणीवांचा जागर होणार.


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात, सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘दुर्गा माता दौड’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता मालवण शहरातील रामेश्वर कॉम्प्लेक्ससमोरील 'दुर्गा देवी' मंदिरापासून या दौडला सुरुवात होणार असून, सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील जेटीवर समारोप होणार आहे. या दुर्गा माता दौड मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


ह्या 'दुर्गा माता दौड' च्पा' माध्यमातून पवित्र हिंदू धर्म, समृद्ध भारतीय संस्कृती आणि उच्च जीवनमूल्यांची तरुण पिढीमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश आहे. या पवित्र पर्वाच्या माध्यमातून माता दुर्गेचे सामर्थ्य, तिच्या शक्तिरूपाची प्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाचा वारसा जनमानसात रुजविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात येत असून याद्वारे 'हिंदवी स्वराज्य स्थापना' तत्व - सत्व आणि कर्तृत्व जाणीवांचा जागर होणार आहे.


राष्ट्रप्रेम, शिस्त व सुसंस्कारांचे उत्तरदायित्व तसेच सात्विक सक्षम युवापिढीच्या शाश्वत जागृती साठी 'दुर्गा माता दौड' मध्ये सहभागी व्हायचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स