रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड.
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथील १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत सुयश प्राप्त केले. या विजयामुळे संघाची विभागीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी, सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत हा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या संघात इयत्ता आठवीतील नीरजा ढोलम, इयत्ता सातवीतील त्रिशा मयेकर आणि इयत्ता पाचवीतील स्वराली धुरी या बॅडमिंटनपटू विद्यार्थिनींचा समावेश आहे.
रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक तसेच पालक यांनी या यशाबद्दल तिनही बॅडमिंटनपटू विद्यार्थिनींचे खेळाडूंचे अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..!
पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त.
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी.
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो ...